spot_img
26.2 C
New York
Thursday, July 23, 2026

Buy now

spot_img

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप…

महाराष्ट्र शासनाचा १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम, नाशिक विभागात द्वितीय क्रमांक
अहिल्यानगर /१७ मे.
महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात पोलीस विभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  प्रताप दराडे यांना नाशिक विभागात द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
   १०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्तव्य पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य शासनाने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक जाहीर केला आहे.

याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रताप दराडे यांचे अभिनंदन केले आहे. तर अहिल्यानगर शहरचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती  यांनी प्रताप दराडे यांचा सन्मान केला. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

२० वर्षे न्यायाचा खेळखंडोबा! पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष — मग खून कोणी केला?”

२० वर्षे न्यायाचा खेळखंडोबा! पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष — मग खून कोणी केला?”   साक्षीदार फितुर, पुरावे गायब, तपासावर न्यायालयाचे ताशेरे; लोकशाहीत न्याय मिळतो...

राहुरीत रेशन धान्याचा काळाबाजार उघड! सोनगाव सात्रळमध्ये 12 लाखांचा मुद्देमाल जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तरुण अटकेत, दोन वाहनांसह गहू-तांदळाचा साठा पकडला

राहुरी प्रतिनिधी | जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर लगाम घालण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने मोठा धक्का देत राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात रेशनिंगच्या धान्याचा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!