spot_img
32.8 C
New York
Friday, June 5, 2026

Buy now

spot_img

खा. लंकेंच्या गाण्यांना ५५ मिलियन व्हयूज ! इंस्टा, फेसबुक, युटयुबवर विक्रमी चाहते

पारनेर : दि.१७ मे
राज्याच्या राजकारणात अल्पावधीमध्ये विशेष स्थान निर्माण करणाऱ्या खासदार नीलेश लंके यांच्या विविध उपक्रमांवर आधारीत तयार करण्यात आलेल्या गाण्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या गाण्यांना इंस्ट्राग्राम, फेसबुक तसेच युटयुब आदी पब्लिक डोमेनवर तब्बल ५५ मिलियन (५ कोटी ५० लाख) व्हयूज मिळाल्या असून तो विक्रम मानला जातो.
         खा. नीलेश लंके यांनी विधानसभा निवडणूकीत यश संपादन करण्यापूर्वीपासून त्यांचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग असून अनेक गीतकार तसेच संगीतकारांनी त्यांच्या विविध उपक्रमांवर गीते तयार केली असून अनेक नामवंत गायकांनी ही गीते गायली आहेत. खा. लंके हे कोरोना संकटात देवदूत म्हणून संपूर्ण देशासमोर आले. त्यानंतर राज्यातच नव्हे तर देशाच्या विविध भागांमधून त्यांचे फॉलोअर्स वाढले. त्यामुळे लंके यांच्यावरील गाण्यांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातून पसंती मिळाली आहे.
▪️चौकट
आता कॉलर टयुनही !
राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक व्हूज असलेली गाणी अशी नोंद पब्लिक डोमेनमध्ये झाली असून काही गाणी विविध मोबाईल कंपन्यांच्या कॉलर टयुनमध्येही समाविष्ट झाली आहे. आता खा. लंके यांचे चाहते या गाण्यांची कॉलर टयुनही लाऊ शकतात.
▪️चौकट
संपूर्ण टीमसाठी विशेष दिवस
खा. लंके यांच्यावरील गाणी तसेच सोशल मीडियाचे समन्वयक म्हणून काम करणारे मनोज शिंदे यांनी खा. लंके यांच्या गाण्यांना सर्वाधिक व्हूज मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लोकनेते नीलेश लंके यांच्यावर गाणी तयार करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो, मी भाग्यवान आहे, आजचा दिवस माझ्यासाठी आणि आपल्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत विशेष  आहे. खा. नीलेश लंके यांच्या लोकसेवेचा, त्यांच्या जडणघडीचा आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्याचा आरसा या गाण्यांमधून उमटतो आणि त्याचेच फलित म्हणून ही गाणी जनमानसात घर करत असल्याचेही शिंदे यांनी नमुद केले.
▪️चौकट
वृत्तवाहिन्यांवरही खा. लंके यांना पसंती
विधानसभा निवडणूकीमध्ये तब्बल ६० हजार मतांनी विजयी होउन जायंट किलर म्हणून नावारूपास आलेले खा. नीलेश लंके हे माध्यमप्रतिनिधींच्या गळयातील ताईत बनले आहेत. राजकीय क्षेत्रातील कोणताही विषय असो, खा. नीलेश लंके यांच्या प्रतिक्रियेसाठी माध्यम प्रतिनिधी त्यांचा तात्काळ शोध घेतात. कोरोना संकटानंतर खा. लंके यांची क्रेझ आणखीच वाढली. खा. शरद पवार व पवार कुटूंबियांशी अल्पावधीत जोडले गेलेले व्यक्तिमत्व म्हणून खा. लंके यांच्याकडे पाहिले जात असून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे आजवर बातमीचा विषय ठरले आहेत.

Related Articles

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती

रक्तदानातून दिवंगत कर्डिले साहेबांना अभिवादन; राजकीय दिग्गजांची एकत्रित उपस्थिती     कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त सेवा-समर्पणाचा संदेश; अक्षयदादा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम गाजला     दिव्य सार्वमंथन/ प्रतिनिधी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!