spot_img
27.6 C
New York
Monday, July 20, 2026

Buy now

spot_img

मुंबई पोलिसांना मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई :
आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलिस ठाण्याला धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान धमकीचा मेल येताच मुंबई पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी विमानतळ पोलिस ठाण्यात धमकीचा मेल आला.
संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरू आणि सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारक रित्या फाशी दिल्याचा मेलमध्ये दावा करण्यात आला आहे.
दरम्यान धमकीचा मेल येताच यंत्रणा सतर्क झाली आहे. viduthalai_puli_vellum नावाचा ईमेल आयडीवरून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. ईमेल आयडीच्या वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी धमकी देणाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५१(१) (३) (४) आणि ३५१ (१) ख अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

२० वर्षे न्यायाचा खेळखंडोबा! पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष — मग खून कोणी केला?”

२० वर्षे न्यायाचा खेळखंडोबा! पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष — मग खून कोणी केला?”   साक्षीदार फितुर, पुरावे गायब, तपासावर न्यायालयाचे ताशेरे; लोकशाहीत न्याय मिळतो...

राहुरीत रेशन धान्याचा काळाबाजार उघड! सोनगाव सात्रळमध्ये 12 लाखांचा मुद्देमाल जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तरुण अटकेत, दोन वाहनांसह गहू-तांदळाचा साठा पकडला

राहुरी प्रतिनिधी | जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर लगाम घालण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने मोठा धक्का देत राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात रेशनिंगच्या धान्याचा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!