spot_img
33.5 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img

छगन भुजबळांना धमकी,पी ऐ कडे एक कोटीची केली मागणी

आरोपीला पोलिसांनी केली अटक
नाशिक : दि.१७ मे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देत १ कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. छगन भुजबळ यांना फोन करून आरोपीने खंडणीची मागणी केली. भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपीमध्ये संवाद झाला होता. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला सापळा रचत अटक केली.
छगन भुजबळांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्या पथकात मी असून धाडीत मी सहकार्य करेल अशी आरोपीने बतावणी केली होती.
आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. छगन भुजबळांकडे खंडणी मागितल्यामुळे खळबळ उडाली.
यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कुठून फोन आला आणि कुणी केला याचा तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत त्यांनी आरोपीचा शोध घेतला. छगन भुजबळ यांना फोन करून खंडणी मागणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी सापळा रचत अटक केली.
संशयित आरोपीने गुजरातच्या धरमपूर इथे पैसे घेऊन बोलावले होते. मात्र तिथं हुलकावणी देत पेठ तालुक्यातील करंजाळी गावात पैसे घेण्यासाठी बोलावले. राहुल भुसारे या उच्चशिक्षित तरुणाने खंडणीची मागणी केली होती. संशयित आरोपी पेठ तालुक्यातील करंजाळी गावातील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

Related Articles

राहुरीतील व्यापाऱ्याचा विश्वासघात,सोयाबीनचा ३० लाखांचा ट्रक मुद्देमाल जप्त.. ड्रायव्हरचा डाव फसला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, राजगुरुनगरमधून ट्रक ताब्यात..

राहुरीतील व्यापाऱ्याचा विश्वासघात,सोयाबीनचा ३० लाखांचा ट्रक मुद्देमाल जप्त..   ड्रायव्हरचा डाव फसला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, राजगुरुनगरमधून ट्रक ताब्यात..     राहुरी / सार्वमंथन प्रतिनिधी सोयाबीन बियाण्यांनी भरलेला ट्रक...

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!