डॉ तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीचा नगारा वाजला असुन सर्वच नेते म्हणतात कारखाना सुरु झाला पाहिजे. मात्र निवडणूकीत उभे असलेल्या नेते मंडळीकडे कामगारांचे थकित रक्कम देण्यासाठी काय भुमिका आहे या निवडणुकीत नेतृत्व करत असलेल्या नेत्यांनी कामगारांना सांगावे असा खडा सवाल कामगार युनियनच्या वतिने विचारला गेला आहे.
राहुरी येथे राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या वतिने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी युनियनच्या वतिने सत्ताधारी नेत्यांवर गंभिर आरोप करण्यात आले.
राहुरी येथील डॉ तनपुरे कारखान्याचे निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
यादरम्यान कामगारांनी निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या तिनही पॅनल प्रमुखांना समक्ष भेटून कामगारांची कैफियत मांडली आहे.
यामध्ये जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे, शेतकरी विकास मंडळाचे राजुभाऊ शेटे,तर कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ यांची भेट घेतली असुन या नेत्यांनी कामगारांचे थकित देणे देण्या संदर्भात ठोस पावले उचलावीत व आम्हा कामगारांना आश्वासन द्यावे कि कामगरांची थकित रक्कम कशा पद्धतीने देणार आहे.
डॉ तनपुरे कारखान्याचे 80 टक्के कामगार हा ऊस उत्पादक आहे .कामगारांचे तब्बल 138 कोटी देणे आहे मात्र आमच्या कामगारांचे देणं देण्यासाठी ठोस भूमिका कोणीही सांगत नाही, आम्हाला निवडणुकीत राजकारण करायचे नाही पण आम्ही कामगारांनी कारखान्यात अहोरात्र मेहनत घेतलेली आहे.
गेली अनेक वेळा निवडणुका झाला पण कामगार कायमच संचालक मंडळाच्या मागे ठाम पणे उभा राहिला आहे.
सध्या तिन पॅनल उभे आहेत.
आमचा विचार झाला पाहिजे आम्हाला ठोस निर्णय दिला पाहिजे अशी मागणी युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग,सचिव सचिन काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे.




