
राहुरी शहरातील तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी वाहत होते, तर शहरातील मुख्य नाल्या गटारी तुडुंब भरल्याने चहुकडे पाणीच पाणी साचल्याचे व वाहत असल्याचे दिसून आले.
राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने अनेक मोठमोठे झाडे उन्मळून पडली तर विजेचे पोल ही पडल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
राहुरीत सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या वरून राजाच्या अचानक लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची पळापळ उडाली होती.
शहरातील वृद्ध नागरिक व बाजारपेठेतील व्यवसायिकांची पाण्यातून वाट काढताना दमछाक होत होती.
अनेक दुचाकी चालकांनी पाण्यातून रस्ता काढत आपली दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला तर अनेकांच्या गाड्या मध्ये पाणी गेल्याने बंद पडल्याचे दिसून आले.
हवामान खात्याकडुन अंदाज वर्तविण्यात आला होता कि १७ ते २१ दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
या नुसार आज दि.१९ मे रोजी सायंकाळी पाऊने पाच वाजे दरम्यान पावसाला सुरुवात झाली तर अर्धा पाऊण तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले होते.
शहरातील नवी पेठ ,शिवाजी चौक, स्टेशन रोड भागीरथीबाई शाळा रोड, शुक्लेश्वर चौक या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहत होते.
अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे रस्त्याने पाई व दुचाकी वर ,चारचाकी वर, रिक्षा द्वारे, सायकलवर जातानी अनेकांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे रस्ता ओलांडताना अडचण निर्माण झाली होती.
क्लास वरून येताना काही विद्यार्थिनींची दुचाकी स्कुटी वाहन बंद पडले होते.
तर काही वृद्ध महिला व जेष्ठ नागरिक साचलेल्या पाण्यातून रस्ता काढून आपल्या घराकडे वाढ धरत होते..




